India Wins T20 World Cup 2024: भारताच्या विजयानंतर भावूक झाला इरफान पठाण; डोळ्यातून अश्रू झाले अनावर

या विजयानंतर इरफान आपले अश्रू रोखताना दिसत आहे. पण भावना लपवता आल्या नाहीत. त्याला पाहून चाहतेही भावूक झाले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (IND vs SA) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूसह सपोर्टसही भावूक झालेले पहायला मिळाले. माजी क्रिकेटपट्टू इरफान पठाण देखील या सामन्यानंतर भावूक झाला. टिव्हीवर बोलताना त्याला अश्रू अनावर झालेले पहायला मिळाले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement