Michael Slater: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटूची घरगुती हिंसाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता, मानसिक रुग्णालयात 12 महिने उपचारासाठी होणार रवानगी

स्लेटरवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करण्यात आला होता परंतु सिडनी स्थानिक न्यायालयाने आरोपातूतून निर्दोष मुक्तता केली. पण मॅजिस्ट्रेट रॉस हडसनने स्लेटर यांना 12 महिन्यांच्या उपचार सत्रातून जाण्याचे आदेश दिले.

माइकल स्लेटर (Photo Credit: Instagram)

Michael Slater Domestic Violence Case: सिडनी न्यायालयाने (Sydney Court) मानसिक आरोग्याच्या (Mental Health) कारणास्तव ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माइकल स्लेटर (Michael Slater) यांची घरगुती हिंसाचाराचे (Domestic Violence) आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे, असे ऑस्ट्रेलियन राज्य माध्यमांनी सांगितले. 52 वर्षीय स्लेटर यांना ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी अटक केली होती आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपानंतर त्याच्या माजी पत्नीचा छळ व धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)