IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: इंग्लंडला 50 धावांवर पहिला धक्का, अश्विनने डकेटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, भरतचा शानदार झेल (Watch Video)
भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या खेळीत शुभमन गिलने 104 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला पहिला धक्का लागला आहे. इंग्लडंचा स्कोर 52/1
IND vs ENG 2nd Test Day 3: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. तत्पूर्वी, भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करत 396 धावावर बाद झाला. भारताचा युवा स्टार यशस्वी जैस्वालने शानदार दुहेरी शतक झळकावले. तसेच इंग्लंडचा संघ दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 253 धावांत गारद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. आता ही आघाडी दुसऱ्या डावात 171 धावांची झाली आहे. जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. दरम्यान, तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात भारतीय संघ 255 धावांवरच बाद झाला आहे. भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या खेळीत शुभमन गिलने 104 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला पहिला धक्का लागला आहे. इंग्लडंचा स्कोर 52/1
Partnership broken! ⚡️@ashwinravi99 with the opening breakthrough as local lad @KonaBharat takes a fine catch!
England lose Ben Duckett.
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hO3sJEQslz
— BCCI (@BCCI) February 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2024 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

