Sachin Tendulkar Deepfake Video: सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओ प्रकरणी अॅपच्या मालकावर FIR दाखल

सचिन तेंडुलकरचा स्वीय सहाय्यक रमेश पारडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर नोंदवला आहे.

Sachin Tendulkar (PC -Twitter/ANI)

Sachin Tendulkar Deepfake Video: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) च्या डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) गेमिंग वेबसाइट आणि फेसबुक पेजविरोधात एफआयआर नोंदवला आहे. सचिन तेंडुलकरचा स्वीय सहाय्यक रमेश पारडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर नोंदवला आहे. सोमवारी, दिग्गज भारतीय फलंदाजाने अॅपचा प्रचार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या स्वतःच्या बनावट व्हिडिओपासून सर्वांना सावध केले. व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरच्या व्हिडिओ आणि व्हॉईसमध्ये फेरफार करून तेंडुलकर अॅपची जाहिरात करत असल्याचा आवाज काढण्यात आला आहे. (हेही वाचा - Sachin Tendulkar Deepfake Video: सचिन तेंडुलकरचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल, अशा व्हिडिओना रिपोर्ट करण्याचे मास्टर ब्लास्टरचे आवाहन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now