ENG vs PAK 1st Test: इंग्लिश फलंदाजाने केली पाकिस्तानची धुलाई; 6 चेंडूत सलग 6 चौकार, कसोटीत टी-20 ची मजा (Watch Video)
या दरम्यान, हॅरी ब्रूकचे धडाकेबाज शतक आणि सौद शकीलची धुलाई हे त्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक होते. ब्रूकने 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
ENG vs PAK: बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील (IND vs PAK) पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी 500 हून अधिक धावा करत विश्वविक्रम केला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा इंग्लंड संघ जगातील पहिला संघ ठरला आहे. या दरम्यान, हॅरी ब्रूकचे (Harry Brook) धडाकेबाज शतक आणि सौद शकीलची धुलाई हे त्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक होते. ब्रूकने 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर पुढच्या 12 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 34 धावा फटकावल्या. यातून ब्रूकने डावखुरा फिरकीपटू सौद शकीलच्याच षटकात 6 चेंडूत सलग 6 चौकार ठोकले.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)