IND vs ENG 1st Test Day 4 Live Score Update: इंग्लडंला सामना जिंकण्यासाठी एक विकेटची गरज, आर अश्विन बाद
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला नववा मोठा धक्का बसला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 77 षटकांत 6 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. इंग्लंड संघाने 126 धावांची आघाडी घेतली होती. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 64.3 षटकांत केवळ 246 धावा करू शकला नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाचा डाव 121 षटकात 436 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाने 190 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 87 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेला इंग्लंडचा संपूर्ण संघ 102.1 षटकात 420 धावा करत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून अनुभवी फलंदाज ऑली पोपने सर्वाधिक १९६ धावांची खेळी खेळली. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 231 धावांची गरज आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला आठवा मोठा धक्का बसला आहे. केएस भरत 28 धावा करून टॉम हार्टलीचा बळी ठरला. टीम इंडियाचा स्कोर 177/9
1ST Test. WICKET! 63.2: Ravichandran Ashwin 28(84) st Ben Foakes b Tom Hartley, India 177/9 https://t.co/HGTxXf8b1E #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2024 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

