IND vs NZ 3rd T20 Live Score Update: न्यूझीलंडची लाजिरवाणी सुरुवात, सात धावांत पडल्या चार विकेट, हार्दिक-अर्शदीपने केला कहर

भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या.

Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद 126 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ब्लेअर टिकनर आणि ईश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 20 षटकात 235 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला चौथा मोठा झटका बसला. न्यूझीलंडचा स्कोर 7/4.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement