GGW vs DCW: शफाली वर्माच्या वादळी अर्धशतकामुळे दिल्लीचा गुजरातवर मोठा विजय
शफाली वर्माने 28 चेंडूत नाबाद 76 धावांची खेळी केली. तर कर्णधार मेग लॅनिंगने 15 चेंडूत 21 धावा केल्या. शफालीने 10 चौकार आणि 5 षटकार मारून गुजरातच्या गोलंदाजीची हवा काढली.
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमध्ये झालेल्या गुजरात जायंट्स (Gujarat Giants Women) विरुद्ध दिल्ली कॅपिटलच्या (Delhi Capitals Women) सामन्यात गुजरातने दिलेल्या 106 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या शफाली वर्मा (Shafali Verma) आणि मेग लॅनिंग दमदार खेळी करत या सामन्यात मोठा विजय प्राप्त केला. अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक करणाऱ्या शफाली वर्माने 28 चेंडूत नाबाद 76 धावांची खेळी केली. तर कर्णधार मेग लॅनिंगने 15 चेंडूत 21 धावा केल्या. शफालीने 10 चौकार आणि 5 षटकार मारून गुजरातच्या गोलंदाजीची हवा काढली. प्रथम फलंदाजी करताना . गुजरातने 9 गडी गमावत 20 षटकात 105 धावांची मजल मारली. शफालीच्या खेळीमुळे अवघ्या 7.1 षटकांत हे आव्हान गाठण्यास यश आले.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement