ठरलं तर! मुंबईमध्ये 9 डिसेंबरला होणार WPL 2024 चा लिलाव
ज्यामध्ये 5 फ्रँचायझी बोली लावतील. माहितीनुसार, बोली लावण्यासाठी सर्व 5 संघांना दीड कोटी रुपयांची अतिरिक्त पर्स दिली जाणार आहे.
2024 हंगामासाठी महिला प्रीमियर लीग (WPL) खेळाडूंचा लिलाव 9 डिसेंबर 2023 रोजी मुंबईत होणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च विंडोमध्ये ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 5 फ्रँचायझी बोली लावतील. माहितीनुसार, बोली लावण्यासाठी सर्व 5 संघांना दीड कोटी रुपयांची अतिरिक्त पर्स दिली जाणार आहे. यापूर्वी, सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवण्याच्या याद्या जाहीर केल्या होत्या. ज्यामध्ये सर्व संघांनी 60 खेळाडूंना कायम ठेवले होते. (हेही वाचा: Team India: भारतासाठी या फलंदाजांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहे जलद 2000 धावा, येथे पाहा यादी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)