Ravindra Jadeja Playing With Ziva Dhoni: चेन्नईच्या विजयानंतर धोनीच्या लाडली झिवाने जडेजासोबत केली मस्ती, व्हिडिओ घालत आहे सोशल मीडियावर धुमाकूळ
जडेजाही तिच्यासोबत मस्करी करताना दिसला. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
बुधवारी रात्री चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात सामना झाला. सीएसकेने हा सामना 27 धावांनी जिंकला. याच सामन्यात सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) चमकदार कामगिरी केली आणि त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. धोनीची (MS Dhoni) मुलगी झिवा धोनी (Ziva Dhoni) आणि रवींद्र जडेजा यांच्यात मॅचनंतर मजेदार मस्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वास्तविक, सामना संपल्यानंतर जडेजा आणि झिवा बराच वेळ एकमेकांशी बोलत होते. जडेजाही तिच्यासोबत मस्करी करताना दिसला. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे झिवा तिच्या वडिलांचा सामना पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचली होती. एमएस धोनीनेही आपल्या मुलीला अप्रतिम विजयाची भेट दिली. मात्र, जडेजा आणि झिवा यांचा मस्तीचा हा इंटरनेटवर चर्चेचा विषय राहिला आहे.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)