DC vs SRH, IPL 2024 35th Match Toss Update: दिल्लीने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

सनरायझर्स हैदराबाद सध्या 6 सामन्यांतून चार विजय आणि 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

DC vs SRH, IPL 2024 35th Match Toss Update: दिल्लीने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
SRH vs DC (Photo Credit - X)

DC vs SRH, IPL 2024 35th Match: आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ 20 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता एकमेकांविरुद्ध खेळतील. सनरायझर्स हैदराबाद सध्या 6 सामन्यांतून चार विजय आणि 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, दिल्लीने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2024 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).