Delhi Beat Mumbai: रोमहर्षक सामन्यात दिल्लीने विजयाची केली नोंद, मुंबईचा 10 धावांनी केला पराभव
आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 43वा सामना (IPL 2024) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात दिल्लीने मुंबईचा 11 धांवांनी पराभव केला.
DC vs MI, IPL 2024 43th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 43वा सामना (IPL 2024) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात दिल्लीने मुंबईचा 11 धांवांनी पराभव केला. तत्तपुर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीने मुंबईला 258 धांवांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीसाठी स्फोटक फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने 84 धावांची शानदार खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 247 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्ससाठी स्टार फलंदाज तिलक वर्माने सर्वाधिक 63 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी मुकेश कुमार आणि रसिक दार सलाम यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
Match 43. Delhi Capitals Won by 10 Run(s) https://t.co/BnZTzctcaH #TATAIPL #IPL2024 #DCvMI
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2024 07:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

