DC vs MI, IPL 2024 Live Score Update: दिल्लीला पहिला मोठा धक्का, जेक फ्रेझर-मॅकगर्क 84 धावा करुन बाद

दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स संघ 4 सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने 3 सामने जिंकले असून संघ 8व्या स्थानावर आहे.

DC vs MI, IPL 2024 43th Match:  आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 43वा सामना (IPL 2024) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. या मोसमात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असेल. शेवटच्या वेळी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स संघ 4 सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने 3 सामने जिंकले असून संघ 8व्या स्थानावर आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीला पहिला मोठा झटका लागला आहे. दिल्लीचा स्कोर 114/1

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement