Team India चा गोलंदाज Kuldeep Yadav ची कॉपी करताना दिसला 'हा' चाहता, Delhi Capitals ने शेअर केला खास व्हिडीओ

उबेद खान (Ubaid khan) नावाच्या या चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो कुलदीप यादवच्या बॉलिंग अॅक्शनची कॉपी करत आहे.

Photo Credit - Twitter

Viral Video: भारतातील प्रत्येक गल्लीबोळात क्रिकेटचे चाहते आढळतात. देशातील क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून भावना आहे. अशाच एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) अॅक्शनची कॉपी करताना दिसत आहे. उबेद खान (Ubaid khan) नावाच्या या चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो कुलदीप यादवच्या बॉलिंग अॅक्शनची कॉपी करत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना एका चाहत्याने लिहिले होते की, हा व्हिडीओ कुलदीप यादवपर्यंत पोहोचला पाहिजे. उबेदचा हा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सनेही त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यात कुलदीप यादवला टॅगही केले आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now