David Warner Wishes On Chhath Puja 2024: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने भारतीय चाहत्यांना छठ सणानिमित्त दिल्या शुभेच्छा
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर करत छठ महापर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
छठ पूजेचा सण, ज्याला सुरज षष्ठी, छठ, छठी, छठ पर्व, दला पूजा आणि प्रतिहार असेही म्हणतात, धार्मिक परंपरांचे पालन आणि आदराने साजरा केला जातो. हा चार दिवसीय महोत्सव यावर्षी 5 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून तो उद्या म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. छठ पूजा मुख्यत्वे बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये साजरा केला जातो आणि नेपाळमध्येही या उत्सवाचा व्यापक उत्साह दिसून येतो. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरवरही दिसून आला. या शुभ मुहूर्तावर डेव्हिड वॉर्नरने भारतीय चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. यामुळे चाहते खूप खूश आहेत. डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर करत छठ महापर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2024 11:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

