‘Dance Deewane 3’ शोमध्ये आसामी स्पर्धकावर वर्णद्वेषी टिप्पणीवर क्रिकेटपटू Riyan Parag ने घेतला आक्षेप, अशा शब्दात व्यक्त केली निराशा, पहा Tweet

डान्स दिवाने 3 मधील होस्ट राघव जुयालची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये राघव गुंजन सिंह नावाच्या स्पर्धकावर वर्णद्वेषी टिप्पणी करताना दिसत आहे. यावर क्रिकेटपटू रियान परागने या घटनेवर आक्षेप व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये राघव आसाममधील गुंजन संदर्भात ‘मोमो’, ‘चौमीन’ असे शब्द वापरताना दिसत आहे.

आसामी स्पर्धकावर वर्णद्वेषी टिप्पणी (Photo Credit: Twitter)

वंशवाद (Racism) ही जगभर एक प्रचलित समस्या आहे. रंग, जात, पंथ किंवा इतर स्वरूपाच्या आधारावर भेदभावाची प्रकरणे अनेकदा समोर येतात. अशीच एक घटना डान्स दिवाने 3 या लोकप्रिय डान्स शोच्या एका भागादरम्यान पाहायला मिळाली. शोचा होस्ट राघव जुयालने  (Raghav Juyal) आसाममधील स्पर्धक गुजन सिंग विरुद्ध वर्णद्वेषी टिप्पण्या केल्याचा आरोप केला जात आहे. ही क्लिप जुन्या एपिसोडची आहे कारण जुयालने शो सोडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now