साऊथचा सुपरस्टार Allu Arjun च्या ‘पुष्पा’ सिनेमाच्या लूकमध्ये दिसला टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू; बिडी ओढतानाचा फोटो व्हायरल, पण दिली चेतावणी (See Photo)

भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसारख्या खतरनाक लूकमधील फोटो शेअर केला आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा: द राइज’मधून त्याने प्रेरणा घेतली. जडेजाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये जडेजा अल्लू अर्जुनप्रमाणेच बिडी ओढताना दिसत आहे. मात्र, त्याने आपल्या पोस्टमध्ये चेतावणी दिली आहे.

अल्लू अर्जुनच्या लुकमध्ये भारतीय अष्टपैलू (Photo Credit: Instagram)

भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अनेकदा त्याच्या लूकमुळे खूप चर्चेत असतो. दरम्यान, जडेजाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सारख्या खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) मधून त्याने प्रेरणा घेतली. त्याने त्याच्या फोटोसोबत अल्लू अर्जुनचा फोटोही शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindrasinh jadeja (@ravindra.jadeja)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now