Chris Jordan Joins Mumbai Indians: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल, 'या' खेळाडूची घेणार जागा
मुंबई इंडियन्सची या आयपीएल मधील कामगिरी खराब झालेली असून मुंबईचा संघ हा गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
इंग्लडचा वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डन (Chris Jordan) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात सामील झाला असून आयपीएलचा (IPL 2023) उर्वरीत हंगाम तो मुंबई कडून खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) जखमी झाल्यानंतर त्याची जागा आता क्रिस जॉर्डन घेणार आहे. जोफ्रा आर्चर आपल्या पुढील उपचारासाठी आता पुन्हा मायदेशी परतणार आहे. सध्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी फारच खराब होत असून यामुळे क्रिस जॉर्डनच्या समावेशामुळे संघाची कामगिरी सुधारण्याची चिन्ह आहेत.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)