CSK vs GT, IPL 2024 Toss Update: 'करो या मरो'च्या लढतीत चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

CSK vs GT, IPL 2024 Toss Update: 'करो या मरो'च्या लढतीत चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

CSK vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियमवर  (Narendra Modi Stadium, Ahmedabad) संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्जने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 गमावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 7 सामने गमावले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. दरम्यान, चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 10, 2024 07:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).