MI vs CSK, IPL 2024 29th Match Live Score Update: चेन्नईने मुंबईला दिले 207 धावांचे लक्ष्य, दुबे-गायकवाडची शानदार कामगिरी
गेल्या 5 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चार सामने जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्सला केवळ एकच सामना जिंकता आला आहे.
MI vs CSK, IPL 2024 29th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 29 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमात दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळायला आले आहेत. गेल्या 5 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चार सामने जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्सला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने 69, शिवम दुबे 66 धावांची आक्रमक खेळी केली. तर, मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 207 धावा करायच्या आहेत.
#IPL2024 #MIvCSK #IPL #MIvsCSK
Innings break at the Wankhede!
Shivam Dube (66*), Ruturaj Gaikwad (69) power #ChennaiSuperKings to 206/4 against #MumbaiIndians
Follow Live: https://t.co/JSr4lkBtSL pic.twitter.com/NA5KQgnTkF
— TOI Sports (@toisports) April 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2024 09:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

