SRH vs CSK IPL 2024 18th Match Live Score Update: चेन्नईने हैदराबादला दिले 166 धावांचे लक्ष्य, शिवम दुबेची उत्कृष्ट कामगिरी
आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांमधील हा चौथा सामना आहे. या सामन्यात सीएसकेचा तिसरा विजय नोंदवण्याचा आणि हैदराबादचा दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल.
SRH vs CSK IPL 2024 18th Match: हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलचा 18 सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) यांच्यात खेळवला जात आहे. आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांमधील हा चौथा सामना आहे. या सामन्यात सीएसकेचा तिसरा विजय नोंदवण्याचा आणि हैदराबादचा दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना चन्नईने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून शिवम दुबेने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजन, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकात 166 धावा करायच्या आहेत.
#IPL2024 #SRHvCSK #IPL #SRHvsCSK
Shivam Dube (45), Ajinkya Rahane (35) guide Chennai Super Kings to 165/5
FOLLOW LIVE: https://t.co/ArABDPoNlk pic.twitter.com/jjua1LTlct
— TOI Sports (@toisports) April 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2024 09:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

