IND vs BAN 2nd Test Day 5 Live Score Update: लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा 8 धावा करन बाद

आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 95 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे.

Rohit Sharma (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यातील आज शेवटचा दिवस आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचे तीन दिवस पावसामुळे वाय गेले. आता हा सामाना रोमांचक वळणावर आला आहे. दरम्यान दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ 146 धावांवर गारद झाला आहे. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 95 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. रोहित शर्मा 8 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 18/1