IND vs SL 3rd T20 Live Update: चहलने भारताला मिळवून दिले चौथे यश, श्रीलंकेचा संघ अडचणीत

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी खेळताना आपले तिसरे टी-20 शतक पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला चौथा धक्का बसला आहे. चरित अस्लंका 19 धावा करून युझवेंद्र चहलचा बळी ठरला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement