IND W vs SA W 3rd T20I Toss Update: कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकली, दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी केले अंमत्रित

आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची संधी नाही, पण हा सामना जिंकून ते मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकते. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे.

IND vs SA (Photo Credit - X)

IND W vs SA W 3rd T20I: भारतीय महिला संघ सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेसोबत 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता तिसरा सामना आज रात्री 7 वाजल्यापासून एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाईल. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची संधी नाही, पण हा सामना जिंकून ते मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकते. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे. दरम्यान भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, ॲनेके बॉश, ॲनेरी डेर्कसेन, एलिझ-मारी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा चेत्री (विकेटकीपर), एस सजना, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement