IND vs AUS 3rd ODI: निर्णायक सामन्यात दोन्ही संघ 'या' दिग्गजांसह उतरणार आहेत मैदानात, प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
ऑस्ट्रेलिया संघाने दुसरा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे खेळला जात आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आजपासून थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलिया संघाने दुसरा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णायक सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. भारताने संघात कोणताही बदल केलेला नाही. निर्णायक सामन्यात दोन्ही संघ या दिग्गजांसह उतरणार आहेत.
प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाका
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, मार्कस स्टॉइनिस, अॅलेक्स कॅरी, अॅडम झाम्पा, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, मिचेल स्टार्क.