Team India: बोलो तारा रा रा... कॅप्टन शिखर धवनने खेळाडूनां शिकवली अशी हुक स्टेप, व्हिडीओ झाला व्हायरल (Watch Video)

लक्ष्मणने या डान्सच्या आधीचा UNSEEN व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Photo Credit - Twitter

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) तीन सामन्यांची एकदिवसीय (ODI Match) आंतरराष्ट्रीय मालिका 2-1 ने जिंकली आणि त्यानंतर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील संघ ड्रेसिंग रूममध्ये 'बोलो तारा रा रा' या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसला. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, परंतु या व्हिडिओमागे एक कथा आहे, जी वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी शेअर केली आहे. लक्ष्मणने या डान्सच्या आधीचा UNSEEN व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की शिखर धवनने या गाण्याचे हुक स्टेप प्रथम ड्रेसिंग रूममधील सर्व खेळाडूंना शिकवले आणि सर्वांनी त्याचा खूप आनंद घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)