MI vs KKR, IPL 2024 Live Score Update: केकेआरला मिळाली मोठी विकेट, रसेलने सूर्याला केले बाद; डेव्हिड क्रिजवर
मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 170 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईला सातवा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 121/7
MI vs KKR, IPL 2024: आज आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहे. (MI vs KKR) हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. केकेआर संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई संघ नवव्या स्थानावर आहे. म्हणजेच दोन्ही संघांना हा सामना जिंकून पुढे जायचे आहे. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या कोलकाताने 20 षटकात 169 धावा केल्या आहे. केकेआरकडून व्यंकटेश अय्यर 57 आणि मनीष पांडेने 42 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर मुंबईकडून तुषाराने आणि बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहे. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 170 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईला सातवा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 121/7
Match 51. WICKET! 15.3: Suryakumar Yadav 56(35) ct Phil Salt b Andre Russell, Mumbai Indians 120/7 https://t.co/iWTqcAtqQm #TATAIPL #IPL2024 #MIvKKR
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 03, 2024 11:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

