IPL 2025 Retention Announcement: रिटेनशन पॉलिसीबाबत मोठा अपडेट, बीसीसीआयने अचानक घेतला 'हा' निर्णय

येत्या 24 तासांत किंवा आज (शनिवार) रिटेन्शन नियमांची घोषणा होऊ शकते, असे मानले जात आहे.

IPL 2025 (Photo Credit - X)

IPL 2025: आयपीएल 2025 ची तयारी जोरात सुरू आहे. यावेळी लिलाव होणार आहे. याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, रिटेन्शन पॉलिसीमध्ये (IPL 2025 Retention) एक मोठे अपडेट आले आहे. रिटेन्शन नियमांबाबत येत्या 24 तासांत मोठी बातमी येण्याची शक्यता आहे, कारण आज गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे. येत्या 24 तासांत किंवा आज (शनिवार) रिटेन्शन नियमांची घोषणा होऊ शकते, असे मानले जात आहे. क्रिकबझने आपल्या अहवालात म्हटले आहे की आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक शनिवारी (28 सप्टेंबर) सकाळी 11:30 वाजता बेंगळुरूमधील फोर सीझन्स हॉटेलमध्ये होणार आहे. ही बैठक अचानक बोलावण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळीच त्यांच्या बैठकीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, रविवारी बेंगळुरू येथे होणाऱ्या महासभेनंतर रिटेन्शन ठेवण्याबाबतचा निर्णय जाहीर होईल, असे मानले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)