Chennai Super Kings ला मोठा धक्का, IPL 2024 मधून स्टार खेळाडू बाहेर
आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता स्टोक्सने हा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप 2023 नंतरच्या क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराने हा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) खेळताना दिसणार नाही. खुद्द आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) याला दुजोरा दिला आहे. आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता स्टोक्सने हा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप 2023 नंतरच्या क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराने हा निर्णय घेतला आहे. स्टोक्स हा चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएलच्या शेवटच्या आवृत्तीत यशस्वी मोहिमेचा एक भाग होता. मात्र, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघात त्याला फारशी संधी देण्यात आली नाही. (हे देखील वाचा: IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सर्वांच्या नजरा असतील 'या' महान खेळाडूंवर, आपल्या कामगिरीने करु शकतात कमाल)
🦁 NEWS FROM THE PRIDE🔔
Read More ⬇️
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2023 06:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

