Big Bash League 2021-22: लाइव्ह मॅचमध्ये स्टार ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघ गोलंदाजाला केले Kiss, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या अ‍ॅशेस मालिकेसोबत बिग बॅश टी-20 लीगचा देखील सुरु आहे. कधी कधी खेळात अशा घटना घडतात ज्या खेळापेक्षा प्रेक्षकांना अधिक आकर्षित करतात. अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामन्यातील अशाच एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्ट्रायकर्सचा कर्णधार पीटर सिडलने लाइव्ह मॅच दरम्यान आपल्या गोलंदाजाचे अनोख्या पद्धतीने चुंबन घेत सर्वांनाच चकित केले.

डॅनियल वॉरॉल आणि पीटर सिडल (Photo Credit: Twitter/BBL)

सिडनी क्रिकेट ग्राउंड (Sydney Cricket Ground) येथे सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) आणि अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) यांच्यातील बिग बॅश लीग (Big Bash League) खेळादरम्यान मैत्री आणि आपुलकीचे प्रदर्शन एका नवीन स्तरावर नेण्यात आले. स्ट्रायकर्सचा अनुभवी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पीटर सिडलने (Peter Siddle) सहकारी वेगवान गोलंदाज डॅनियल वॉरॉलच्या (Daniel Worrall) गालावर किस केली ज्याने त्यांच्या दोन्ही चेहऱ्यावर हसू उमटले. ही घटना टेलिव्हिजनवर लाइव्ह प्रक्षेपित करण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement