SRH vs RCB, IPL 2024 41th Match Toss Update: बेंगळुरूने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
हैदराबादने शेवटचे चार सामने जिंकले आहेत. SRH आणखी एक सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. त्याने आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकले असून 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी करा किंवा मरोच्या स्थितीत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.
RCB vs SRH, IPL 2024: आजचा आयपीएल सामना (IPL 2024) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs SRH) यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून दोन्ही संघ आमनेसामने येतील. हैदराबादने शेवटचे चार सामने जिंकले आहेत. SRH आणखी एक सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. त्याने आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकले असून 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी करा किंवा मरोच्या स्थितीत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. आरसीबीने आठपैकी सात सामने गमावले असून ते टेबलमध्ये तळाच्या दहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, बेंगळुरूने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्ण घेतला आहे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल
🚨 Toss Update 🚨
Royal Challengers Bengaluru elect to bat against Sunrisers Hyderabad.
Follow the Match ▶️ https://t.co/2EpEyR3hPu#TATAIPL | #SRHvRCB pic.twitter.com/BuJqnYO4Ic
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2024 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

