PBKS vs RCB, IPL 2023 Match 27 Live Score Update: बंगळुरूने पंजाब किंग्जचा 24 धावांनी केला पराभव, मोहम्मद सिराजने घेतल्या सर्वाधिक चार विकेट
मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामना खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 24 धावांनी पराभव केला.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 27 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामना खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 24 धावांनी पराभव केला. तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 174 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सलामीवीर फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 84 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून हरप्रीत ब्रारने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा संघ 18.2 षटकांत 150 धावांवर गारद झाला. पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
Match 27. Royal Challengers Bangalore Won by 24 Run(s) https://t.co/CQekZNsh7b #TATAIPL #PBKSvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2023 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

