WPL 2023 Opening Ceremony Live Streaming: सामन्यापूर्वी 'या' बाॅलिवूड स्टार्सची भरणार जत्रा, कधी आणि कुठे पाहणार उद्घाटन सोहळा घ्या जाणून
या स्पर्धेचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. मुंबईचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे, तर गुजरात जायंट्सचे नेतृत्व बेथ मुनीकडे आहे.
आजपासून भारतीय महिला क्रिकेटचे नवे पर्व सुरू होत आहे. वर्षानुवर्षे बीसीसीआयचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला हंगाम 4 ते 26 मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम या दोन स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. मुंबईचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे, तर गुजरात जायंट्सचे नेतृत्व बेथ मुनीकडे आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन समारंभ 4 मार्च रोजी सामन्याच्या दोन तास आधी संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होईल. स्पोर्ट्स-18 चॅनलवर तुम्ही WPL 2023 चा उद्घाटन सोहळा पाहू शकता. तुम्ही WPL 2023 च्या उद्घाटन समारंभाचे लाइव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema अॅपवर पाहू शकता. बॉलिवूड स्टार्स कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन या कार्यक्रमात परफॉर्म करणार असल्याचे बीसीसीआयने आधीच जाहीर केले आहे. याशिवाय रॅपर एपी धिल्लन आणि गायक शंकर महादेवन परफॉर्म करणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)