MS Dhoni Helicopter Shot: आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीने दाखवला जुना फॉर्म, चेपॉकवर लगावला हेलिकॉप्टरने शाॅट (Watch Video)

चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध खेळायचा आहे.

Happy Birthday MS Dhoni (Photo Credit - Twitter)

MS Dhoni Helicopter Shot: चेन्नई सुपर किंग्ज संघाचे (CSK) खेळाडू आयपीएल 2024 हंगाम (IPL 2024) सुरू होण्यापूर्वी जोरदार सराव करताना दिसत आहेत. यामध्ये सीएसके कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नावाचाही समावेश आहे, ज्याचा जुना फॉर्म एमए चिदंबरम स्टेडियमवर त्याच सराव दरम्यान दिसला होता. धोनी सरावात आपल्या संघाच्या गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळताना दिसला. ज्यामध्ये त्याने हेलिकॉप्टर शॉट देखील खेळला आणि तो थेट स्टँडवर पडला, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध खेळायचा आहे. (हे देखील वाचा: IPL 2024 Opening Ceremony: आयपीएल 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात अनेक बॉलिवूड तारे वाढवणार ग्लॅमरचा तडका, हजारो चाहते होणार साक्षीदार)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)