BCCI ने Rajiv Shukla यांना दिली मोठी जबाबदारी, तर Ashish Shelar ही दिसणार नवीन भूमिकेत

शुक्रवारी बीसीसीआयने ही घोषणा करताना सांगितले की, राजीव शुक्ला आणि आशिष शेलार हे कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील. राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

Ashish Shelar and Rajiv Shukla (Photo Credit - X)

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशियाई क्रिकेट परिषदेत आपला प्रतिनिधी नियुक्त केला आहे. राजीव शुक्ला यांच्याव्यतिरिक्त, बीसीसीआयने आशिष शेलार यांची एसीसीमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. शुक्रवारी बीसीसीआयने ही घोषणा करताना सांगितले की, राजीव शुक्ला आणि आशिष शेलार हे कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील. राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयमध्ये विविध पदांवर काम केले आहे. याशिवाय त्यांनी आयपीएल अध्यक्षपदही भूषवले आहे. तर आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काम केले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement