IND vs BAN T20 WC 2024 Super 8 Live score Update: बांगलादेशला पाचवा धक्का, कर्णधार नजमुल हुसेन शांतो बाद, बुमराहला मिळाली विकेट
भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने 50 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर बांगलादेशकडून तनझिम हसन साकिब आणि रिशाद हुसेन प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
IND vs BAN T20 WC 2024 Super 8: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील 47 वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा सातवा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तर बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडू पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने 196 धावा फळकावर लावल्या आहे. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने 50 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर बांगलादेशकडून तनझिम हसन साकिब आणि रिशाद हुसेन प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 197 धावा करायच्या आहेत. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला पाचवा धक्का लागला आहे. बांगलादेशचा स्कोर 109/5
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)