Tamim Iqbal Heart Attack: बांगलादेश संघाचा खेळाडू तमीम इक्बालला सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल, क्रिकेट विश्वात खळबळ

क्रिकेट विश्वाला हादरवून सोडणार माहिती समोर येत आहे. क्षेत्ररक्षण करताना बांगलादेश संघाचा क्रिकेटपटू तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका आल्याची घटनासमोर आली आहे.

PC-X

Tamim Iqbal Heart Attack: क्रिकेट जगतात खळबळजणक घटना घडली आहे. बांगलादेश संघाचा क्रिकेटपटू तमीम इक्बालला (Tamim Iqbal) हृदयविकाराचा झटका आल्याची घटनासमोर आली आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये क्षेत्ररक्षण करताना तमीम इक्बालला (Dhaka Premier League) हृदयविकाराचा झटका आला. ढाका प्रीमियर लीगमध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील सामना होत आहे. मोहम्मद स्पोर्टिंग क्लबकडून क्षेत्ररक्षण करताना ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी वंशीय क्रिकेटपटूचा इग्लंडमध्ये सामन्यादरम्यान पिचवरच उष्माघताने मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज ही घटना समोर आली आहे.

🚨BREAKING NEWS🚨

Bangladesh cricketer Tamim Iqbal suffered a heart attack while fielding during a Dhaka Premier League match between Mohammedan Sporting Club and Shinepukur Cricket Club on Monday.

✍️ @ShayanAcharya | Read: https://t.co/5pCyO6hZk4 | #Cricket pic.twitter.com/xMtTwRyVzm

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement