Bangladesh Beat Zimbabwe, 2nd Test Day 3 Video Highlights: बांगलादेशचा दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेवर 106 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली, सामन्याचे हायलाइट्स पहा

दुसऱ्या डावात 217 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ 46.2 षटकांत फक्त 111 धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेकडून बेन करनने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.

PC-X

Bangladesh National Cricket Team vs Zimbabwe National Cricket Team, 2nd Test Day 3 Full Highlights: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh vs Zimbabwe) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 28 एप्रिलपासून खेळवण्यात (BAN vs ZIM 2nd Test) आला. दोन्ही संघांमधील हा सामना चट्टोग्राममधील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवण्यात आला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने झिम्बाब्वेचा एक डाव आणि 106 धावांनी पराभव केला. यासह बांगलादेश संघाने मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली. पहिल्या डावात झिम्बाब्वेला 227 धावांवर रोखल्यानंतर, बांगलादेशने शानदार फलंदाजी करत 444 धावा केल्या आणि 217 धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली. या मालिकेत बांगलादेशचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतो यांनी केले. तर, झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या खांद्यावर होती.

तिसऱ्या दिवसाच्या सामन्याचे हायलाइट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement