Reece Topley Out of World Cup: इंग्लंडसाठी वाईट बातमी, दुखापतग्रस्त रीस टोपली वर्ल्ड कपमधून बाहेर

खुद्द इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. तो यापुढे उर्वरित विश्वचषक खेळू शकणार नाही.

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत (ICC Cricket World Cup 2023) दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभवानंतर इंग्लंडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा गोलंदाज रीस टोपली (Reece Topley) दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. खुद्द इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. तो यापुढे उर्वरित विश्वचषक खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीला बोटाला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. विश्वचषकात रीस इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. सामन्यादरम्यान त्याने जोरदार चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)