PAK vs NZ 1st Test: बाबर आझमची 2022 मध्ये धूम, कराची कसोटीत अनेक विक्रम
म्हणजेच यंदा त्याच्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सोमवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावले. 48 धावांवरच संघाच्या 3 विकेट पडल्या असताना बाबरने संघाला त्या परिस्थितीतून बाहेर काढले. पाकिस्तानी कर्णधाराने कराची कसोटीत कारकिर्दीतील 9वे शतक झळकावले. या शानदार खेळीत त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. बाबर आझम या वर्षी एकूण आणि कसोटी या दोन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. म्हणजेच यंदा त्याच्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता एका कॅलेंडर वर्षात पाकिस्तानच्या फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)