AUS vs SA CWC 2023 Semi Final 2 Live Update: ऑस्ट्रेलियन संघाला सहावा धक्का बसला, स्टीव्ह स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतला
विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 7 सामने जिंकले होते. हेड टू हेड सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी पराभव केला. गेल्या चार हेड टू हेड सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला असला तरी जेव्हा उपांत्य फेरी गाठली जाते तेव्हा ऑस्ट्रेलियाचाच वरचष्मा दिसतो.
आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ तुल्यबळ लढत देणार आहेत. विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 7 सामने जिंकले होते. हेड टू हेड सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी पराभव केला. गेल्या चार हेड टू हेड सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला असला तरी जेव्हा उपांत्य फेरी गाठली जाते तेव्हा ऑस्ट्रेलियाचाच वरचष्मा दिसतो. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला 49.4 षटकांत केवळ 212 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने 101 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 50 षटकात 213 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सहावा मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा स्कोअर 174/6 आहे.
Smith gone 174-6#SAvsAUS #AUSvRSA
— Mujahid Hussain - PCT 🇵🇰🏏❤️ (@mujahidpct) November 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2023 09:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

