AUS vs PAK ICC World Cup 2023 Live Streaming Online: आज ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान आमनेसामने, दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना; येथे पाहा लाइव्ह
शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) आमनेसामने असतील. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या 18 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) आमनेसामने असतील. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आज कोणताही संघ हरला तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा नसेल. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघ संघर्ष करताना दिसत असून सलग दोन सामने गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून पहिला विजय नोंदवला. तर पाकिस्तान संघाने पहिल्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि शेवटच्या सामन्यात भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
#Australia come into this contest on the back of a strong win, while #Pakistan will have a point to prove after their loss to the hosts.
Who'll take away 2 vital points?
Tune-in to #AUSvPAK in #WorldCupOnStar
Today, 12:30 PM onwards | Star Sports Network#CWC23 #Cricket pic.twitter.com/pv5m90Wigs
— Star Sports (@StarSportsIndia) October 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2023 12:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

