IND W vs AUS W, 18th Match Live Score Update: ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी दिले 152 धावांचे लक्ष्य, रेणुका-दीप्तीने घेतल्या 2-2 विकेट
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारताला 152 धावांचे लक्ष्य दिले आहे. कांगारू संघाकडून ग्रेस हॅरिसने 40 धावांची शानदार खेळी केली.
India Women's National Cricket Team vs Australia Women's National Cricket Team 18th Match: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 18 वा सामना (2024 ICC Women’s T20 World Cup) आज भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळवला जात आहे. ताहलिया मॅकग्रा या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारताला 152 धावांचे लक्ष्य दिले आहे. कांगारू संघाकडून ग्रेस हॅरिसने 40 धावांची शानदार खेळी केली.
Innings Break!
Australia post 151/8 in the first innings.#TeamIndia chase coming up, over to our batters 🙌
📸: ICC
Scorecard ▶️ https://t.co/Nbe57MXNuQ#T20WorldCup | #INDvAUS | #WomenInBlue pic.twitter.com/hd6unzMWNC
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

