Australia Beat India, ICC U19 World Cup Final Live Score Update: टीम इंडियाचे विश्वचषक स्वप्न पुन्हा भंगले, भारताचा अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत लाजिरवाणा पराभव

एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर निर्धारित 50 षटकांमध्ये 7 बाद 253 धावांचे लक्ष्य दिले होते.

IND VS AUS Under 19

गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने धुवाँधार कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये धडक दिली होती. मात्र, अंतिम फेरीमध्ये खराब कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. आज देखील अशीच परिस्थिती ज्युनियर टीम इंडियाची झाली आहे. 254 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची फलंदाजी संपुर्ण ढेपाळली. भारताकडून आदर्श सिंग (47) आणि मुरगन अभिषेक (42) यांनी चांगली खेळी केली पंरतू त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा संपुर्ण संघ हा 174 धावांवर बाद झाला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now