Ashes 2021-22: तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाकडून प्लेइंग XI मध्ये बदल, स्कॉट बोलैंड करणार डेब्यू
तर आता येत्या रविवारी खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मध्ये आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
Ashes 2021-22: इंग्लंड सोबत सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस सीरिजमध्ये दोन टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने दणदणीत विजय मिळवला. तर आता येत्या रविवारी खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मध्ये आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघादरम्यान सामना बॉक्सिंग डे टेस्ट मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. परंतु संघात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार कॅप्टन पॅट कमिंस हा परतला असून जो कोरोना प्रोटोकॉलमुळे एडिलेड मध्ये दुसरी टेस्ट मॅच खेळू शकला नाही. या व्यतिरिक्त 32 वर्षीय खेळाडू स्कॉट बोलैंड हा सुद्धा डेब्यू करणार आहे. या दोघांना संघात स्थान मिळाल्याने आता झाय रिचर्ड्सन आणि माइकल नासेर यांना बाहेर बसावे लागणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)