Arshdeep Singh Trolled: अती शहानपणा नडला! अर्शदीप सिंगच्या चुकीमुळे गमवावा लागला सामना; चाहत्यांनी सोशल मीडियावर फटकारले; पाहा

IND vs SL: कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला शेवटच्या तीन षटकात विजयासाठी पाच धावा हव्या होत्या आणि दोन विकेट शिल्लक होत्या. 48व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार असलंकाने शिवम दुबे आणि अर्शदीप सिंगला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत सामना बरोबरीत सोडवला.

Photo Credit - X

IND vs SL 1st ODI Match Tied: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (IND vs SL 1st ODI) बरोबरीत सुटला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत आठ गडी गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 47.5 षटकांत केवळ 230 धावाच करू शकला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला शेवटच्या तीन षटकात विजयासाठी पाच धावा हव्या होत्या आणि दोन विकेट शिल्लक होत्या. 48व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार असलंकाने शिवम दुबे आणि अर्शदीप सिंगला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत सामना बरोबरीत सोडवला. दरम्यान,या सामन्यात अती शहानपणा नडला तो म्हणजे अर्शदीप सिंगचा. झाले असे, शिवम दुबेची विकेट पडल्यानंतर भारताला 14 चेंडून 1 धावांची गरज होती आणि दहाव्या विकेटसाठी अर्शदीप फलंदाजीला आला. यानंतर अर्शदीपने एक धाव काढली असती भारत सामना जिंकला असता पण त्याने हवेत चेंडू मारण्याच्या नादात पायचीत बाद झाला आणि हा सामना टाय झाला. त्याच्या या शहानपणामुळे चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच फटकारले आहे.

पाहा पोस्ट..

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now