Yashasvi Jaiswal Half Century: जैस्वालची पुन्हा 'यशस्वी' सुरुवात, अवघ्या 31 चेंडूत अर्धशतक झळकावले
पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. याआधीचे तीन दिवस पावसामुळे वाया गेल. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. भारतासाठी कोणत्याही फलंदाजाने केलेले हे संयुक्त तिसरे जलद अर्धशतक आहे. या यादीत ऋषभ पंत (28) आणि कपिल देव (30) त्याच्या पुढे आहेत. भारताचा स्कोर 58/1
A FIFTY studded with boundaries by @ybj_19 👏👏
He brings up his 6th Test half-century off 31 deliveries.
Live - https://t.co/VYXVdyN9Xf… #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZvVrU517b8
— BCCI (@BCCI) September 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

