Shreyas Iyer Injury Update: केएल राहुलनंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का, श्रेयस अय्यर आगामी आशिया कपपर्यंत फिट नाही

मागील एप्रिलमध्ये पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून आणि 2023 च्या आयपीएलमधून बाहेर पडलेल्या 28 वर्षीय खेळाडूचे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनर्वसन सुरू आहे.

Shreyas Iyer (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषकापूर्वी पाठीच्या दुखापतीतून बरा होण्याची शक्यता कमी आहे. मागील एप्रिलमध्ये पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून आणि 2023 च्या आयपीएलमधून बाहेर पडलेल्या 28 वर्षीय खेळाडूचे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनर्वसन सुरू आहे. दुखापतीमुळे अय्यर आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघातून बाहेर पडला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अय्यरने नुकतेच बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठदुखीसाठी इंजेक्शन घेतले होते. त्याची पाठ त्याला अजूनही त्रास देत आहे. डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यानंतर अय्यरला पहिल्यांदाच पाठदुखीचा अनुभव आला. यानंतर तो न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी मायदेशात खेळू शकला नाही. चौथ्या कसोटीत पुनरागमन केल्यानंतर त्याच्या वेदना पुन्हा उफाळून आल्या आणि त्याला फलंदाजी करता आली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement