आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) नवव्या सामन्यात बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला जात आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तानला मात करण्याचे आव्हान असेल. तर बांगलादेशकडून पराभव होवुन अफगाणिस्तान दुसऱ्या सामन्यात पहिल्या विजयाच्या शोधात असतील. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर अफगाणिस्तानचे कर्णधार हशमतुल्ला शाहिदीकडे आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 273 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्ताकडून हशमतुल्ला शाहिदी 80 तर अजमतुल्ला उमरझाई 62 धावा केल्या. तसेच भारतीय गोलंदाजाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 273 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला दुसरा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 211/2
CWC2023. WICKET! 25.4: Rohit Sharma 131(84) b Rashid Khan, India 205/2 https://t.co/Oj9O7Gq852 #INDvAFG #CWC23
— BCCI (@BCCI) October 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)