IND vs AUS 3rd ODI Live Score Update: लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा 81 धावा करुन बाद
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज राजकोटमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिले दोन वनडे सामने जिंकून अजेय आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाकडे तिसरी वनडे जिंकून क्लीन स्वीप पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत. तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सही तिसऱ्या वनडेत परतला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वार्नर 56, मार्श 96, स्मिथ 74 आणि मार्नस लॅबुशेनने 72 अश्या दमदार धावा केल्या. तसेत भारताकडून सर्वाधिक बुमराने 3 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला दुसरा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 148/2
3RD ODI. WICKET! 20.6: Rohit Sharma 81(57) ct & b Glenn Maxwell, India 144/2 https://t.co/H0AW9UXagq #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2023 07:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

